नव्या वर्षात प्रिंट घेणार भरारी

जागतिक अर्थव्यवस्था कोरोनातून सावरण्याच्या मार्गावर असल्यामुळे नव्या वर्षात माध्यम क्षेत्राला अच्छे दिन येण्याची आशा पल्लवित झाली आहे.
Newspaper
NewspaperSakal
Summary

जागतिक अर्थव्यवस्था कोरोनातून सावरण्याच्या मार्गावर असल्यामुळे नव्या वर्षात माध्यम क्षेत्राला अच्छे दिन येण्याची आशा पल्लवित झाली आहे.

नवी दिल्ली - जागतिक अर्थव्यवस्था (Global Economy) कोरोनातून (Corona) सावरण्याच्या मार्गावर असल्यामुळे नव्या वर्षात माध्यम क्षेत्राला (Media Field) अच्छे दिन येण्याची आशा पल्लवित झाली आहे. छापील माध्यमे (प्रिंट) (Print) आपले अस्तित्व अधोरेखित करतील. उच्च दर्जाच्या मजकुराला डिजीटलची (Digital) जो़ड देत संकेतस्थळ, ॲप अशा व्यासपीठांच्या पलिकडे जाऊन पॉडकास्ट, ऑग्मेंटेड रिॲलिटीच्या जोरावर त्रिमितीय अनुभूती देण्याची अपेक्षा आहे.

माध्यम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या ग्रुपएम या कंपनीने आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. चालू वर्ष-पुढील वर्ष (धीस इयर-नेक्स्ट इयर) असे अहवालाचे नाव असून त्यात यंदाच्या वर्षात विविध माध्यमांतील आकडेवारीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या अहवालानुसार भारतात यंदा टीव्हीला मागे टाकून डिजिटल सर्वांत मोठे माध्यम बनले आणि जाहिरात खर्चामधील वाटा ४५ टक्के असेल असा अंदाज आहे.

डिजिटल माध्यम मोठा वाटा उचलणार असले तरी ओओएच (आउट ऑफ होम) आणि चित्रपटगृहे कठीण कालखंडानंतर उल्लेखनीय पद्धतीने सावरतील.

- सिद्धार्थ पराशर, ग्रुपएमचे अध्यक्ष (गुंतवणूक-रनिश्चिती)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com