#GujaratVerdict गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुक निकाल; महत्वाच्या घडामोडी

Gujarat_HP_Result_
Gujarat_HP_Result_

गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीचे ई सकाळवरील कव्हरेज -

રાહુલ ગાંધી આવ્યા છે
રાહુલ ગાંધી આવ્યા છે (राहुल गांधी आले आहेत) होय हे गुजरातीमधून का, असा प्रश्न पडला असेल तर त्याला कारणही तसेच आहे. देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष काँग्रेसचा नवा अध्यक्ष हा खऱ्या अर्थाने गुजरातनेच पारखला असून, गुजरातमध्ये मिळालेली लोकप्रियता नरेंद्र मोदींसारख्या गुजराती माणसासमोर राहुल गांधी हा सक्षम पर्याय म्हणून उभा राहण्यास पुरेशी ठरली आहे. 

सकाळी 10.05 वाजता: गुजरातमध्ये भाजप शंभरीपार; काँग्रेसचीही मुसंडी
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (सोमवार) सुरूवात झाली आहे. पहिल्या अर्ध्या तासात आघाडीवर असलेला भाजप गुजरातमध्ये धक्कादायकरित्या पिछाडीवर गेला आणि त्यानंतर पुन्हा किंचितसा आघाडीवर आला. मात्र, गुजरातमधील कल पाहता भाजप विजयाच्या शंभरीजवळ येऊन थांबला आहे. हिमाचलमध्ये मात्र भाजपकडे आघाडी आहे. 

हिमाचलमध्ये सत्ताबदल; भाजपला बहुमत
भाजपने प्रेम कुमार धुमल यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी निवडणूक लढविली होती. हिमाचल प्रदेशात 68 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार केला असून, भाजपने 40 पेक्षा अधिक जागा मिळविल्या आहेत.

पटेल आरक्षणाचा भाजपच्या मुख्यमंत्र्यांना फटका; भाजपचे मोहरे पराभवाच्या उंबरठ्यावर
हार्दिक पटेल यांच्या पाटीदार आरक्षणाच्या आंदोलनाच्या धगीत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागू शकतो. आज (सोमवार) सकाळी 9.30 पर्यंत आलेल्या मतमोजणीच्या कलानुसार, रुपानी आणि नितीन पटेल हे दोघेही त्यांच्या जागेवरून पिछाडीवर आहेत. ​

निकालापूर्वी हार्दिक पटेल सोमनाथाच्या चरणी !
गुजरात विधानसभा निवडणूक निकालाच्या आदल्या रात्री रविवारी तरूण पाटीदार नेता हार्दिक पटेल याने सोमनाथ मंदिरात जाऊन पुजा केली. ​

मोदींच्या मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर, जिग्नेश, अल्पेश पुढे
वडगावमध्ये जिग्नेश मेवानी आणि राधनपूरमध्ये अल्पेश ठाकोर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर, काँग्रेस नेते अर्जुन मोढवाढिया हेही आघाडीवर असल्याचे चित्र आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा आघाडीवर आहेत. तर, उपमुख्यमंत्री नितीन पटेल पिछाडीवर आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com