गुजरातमध्ये भाजपचा विजय; मात्र काँग्रेसची मुसंडी

gujarat-elections
gujarat-elections
अहमदाबाद - गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजपने सर्वाधिक 44 ठिकाणी विजय मिळविला असला तरी त्यांच्या हातून 16 पालिका निसटल्या आहेत. याउलट काँग्रेसने गतवेळच्या तुलनेत दुपटीहून अधिक नगरपालिकांमध्ये विजय मिळविला आहे.

काँग्रेसला गेल्या निवडणुकीत केवळ 12 ठिकाणी विजय मिळाला होता. यंदा मात्र काँग्रेसने 27 पालिकांमध्ये सत्ता मिळविली आहे. गेल्या वेळी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरीही झाली होती. या अपयशापासून धडा घेत काँग्रेसने यावेळी चांगली कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहरी भागामध्ये मोठा पराभव झाला असतानाही काँग्रेसने नगरपालिका निवडणुकीत हे यश मिळविले आहे. एकूण 75 पालिकांसाठी झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह अपक्षांनी मिळून चार जागांवर यश मिळविले.

2013 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या 75 नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपने तब्बल 59 जागांवर विजय मिळविला होता. गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपच्या जागा घटण्याचा; व कॉंग्रेसच्या जागा वाढण्याचाच "ट्रेंड' दिसून आला होता. राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही याचीच पुनरावृत्ती घडली आहे. या पार्श्‍वभूमीवर 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर "शत प्रतिशत'साठी प्रयत्नशील असलेल्या भाजपसाठी हा निकालदेखील धोक्‍याचा इशारा मानला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com