भाजपचा उद्या विजयी जल्लोष

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

अहमदाबाद- उत्तर प्रदेशातील भाजपच्या भव्यदिव्य यशाचे ग्रॅंड सेलिब्रेशन गुजरातमध्ये केले जाणार असून, उद्या (ता.29) रोजी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अहमदाबाद- उत्तर प्रदेशातील भाजपच्या भव्यदिव्य यशाचे ग्रॅंड सेलिब्रेशन गुजरातमध्ये केले जाणार असून, उद्या (ता.29) रोजी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील विजयानंतरचा अमित शहा यांचा हा पहिलाच गुजरात दौरा आहे. साबरमती रिव्हरफ्रंट येथे विजय विश्‍वास कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या संमेलनास भाजपचे एक लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे या वेळेस उपस्थित राहतील. अमित शहा दोन दिवस गुजरातमध्ये थांबणार असून, ते विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्येही सहभाग घेणार आहेत.

Web Title: Gujrat: BJP celebration tomorrow