काँग्रेसचा जाहीरनामा पित्रोडा तयार करणार

महेश शहा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी आघाडीचे टेक्‍नोक्रॅट सॅम पित्रोडा यांच्याकडे सोपविली आहे. यासाठी पित्रोडा हे पाच दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आले असून ते विविध घटकांशी चर्चा करत वास्तविक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पित्रोडा हे अहमदाबाद, सुरत, बडोदा, राजकोट आणि जामनगर या शहरांना भेटी देणार असून ते महिला, लघू आणि मध्यम उद्योजक आणि सामान्य जनतेशी संवाद साधणार आहेत. या जाहीरनाम्याच्या अनुषंगाने पित्रोडा यांनी तेथील लोकांशीही सोशल मिडियाच्या माध्यमातूनही संवाद साधला होता.

आरक्षणाशिवाय प्रगती शक्‍य
काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीची सूत्रे अधिकृतरित्या पित्रोडा यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत, याबाबत बोलताना ते म्हणाले की, "" आम्हाला लोकांचा जाहीरनामा तयार करायचा आहे. शिक्षण, आरोग्य, लघू आणि मध्यम उद्योग, रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण हे मुद्दे केंद्रस्थानी असतील. मागासलेल्या घटकांसाठी आरक्षण हवेच पण आरक्षणाशिवाय देखील प्रगती करणे शक्‍य आहे.''

सगळी जबाबदारी पक्षाकडे
स्वत:चे उदाहरण देताना पित्रोडा म्हणाले की, मी विश्‍वकर्मा समाजात जन्मलो, मी एक सुताराचा मुलगा आहे. मागासलेल्या घटकांसाठी आरक्षणाचा फायदा होतो पण यामुळे इतरांची संधी हिरावून घेतली जाते असे होत नाही. पटेल समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, हे माझ्या तत्वज्ञानाच्याविरोधात नाही पण यावर निर्णय काँग्रेस पक्षाला घ्यावा लागेल. लोकशाही म्हणजे विजेत्यानेच सगळे घ्यावे असे नाही. संघटित नेतृत्व महत्वाचे असते आतापर्यंतच्या लोकशाहीमध्ये ते दिसत नव्हते. आज तर फक्त एकाच व्यक्तीचा बोलबोला दिसतो असे त्यांनी नमूद केले.