काश्मीरमध्ये बंदुकधारींनी बँकेतील 11 लाख लुटले

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील काश्मीर व्हॅलीमध्ये असलेल्या एका बँकेतून चार बंदूकधारी व्यक्तींनी 11 लाख रुपये लुटल्याची घटना आज (गुरुवार) घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जे एण्ड के बँकेची रत्नीपोरा येथे शाखा आहे. या बँकेमध्ये चार बंदूकधारी व्यक्तींनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी रोखपालाच्या डोक्याला बंदूक लावली. बँकेत असलेली 11 लाख रुपयांची रक्कम लुटल्यानंतर ते पळून गेले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.'

दरम्यान, गेल्या पाच महिन्यांमध्ये चार बँका लुटल्या गेल्या आहेत.