अमरनाथ यात्रेवरील हल्ला मुस्लिम व काश्मिरींवर कलंक: मुफ्ती

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जुलै 2017

अनंतनागमध्ये झालेला हल्ला हा सर्व मुस्लिम आणि काश्मीरी नागरिकांवर कलंक आहे. या हल्ल्यामुळे काश्मीरी नागरिकांची मान शरमेने झुकली आहे. अनेक अडचणी पार करून यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी काश्मीरमध्ये येत असतात.

जम्मू - अमरनाथ यात्रेकरुंवर सोमवारी रात्री झालेल्या हल्ला हा काश्मीरी नागरिक आणि मुस्लिमांवर कलंक असल्याचे प्रतिक्रिया जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिली आहे.

अनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात अमरनाथ यात्रेवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले. यात पाच महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यात किमान 14 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर 'सीआरपीएफ'च्या जादा तुकड्या पाठविण्यात आल्या आहेत. हल्ल्यानंतर मुफ्ती यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.

मुफ्ती म्हणाल्या, की अनंतनागमध्ये झालेला हल्ला हा सर्व मुस्लिम आणि काश्मीरी नागरिकांवर कलंक आहे. या हल्ल्यामुळे काश्मीरी नागरिकांची मान शरमेने झुकली आहे. अनेक अडचणी पार करून यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी काश्मीरमध्ये येत असतात. या हल्ल्याची निंदा करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला आशा आहे, की सुरक्षा रक्षक आणि पोलिस हल्लेखोरांना पकडून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करतील.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार
या हल्ल्याचा तीव्रपणे निषेध करावा : नरेंद्र मोदी
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन​

तळेगाव 'MIDC'तील चौथ्या टप्प्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध
मुकेश अंबानींच्या "ऍण्टिलिया'ला आग​