बलात्कार प्रकरणः प्रजापतीच्या जामिनाला स्थगिती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशचे माजी मंत्री व बलात्कार प्रकरणातील आरोपी गायत्री प्रजापती यांच्या जामीनाला लखनौ उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) स्थगिती दिली आहे.

प्रजापतीसह दोघांचा 'पोक्सो' न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. यानिर्णया विरोधात सरकारने लखनौ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. एका 16 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करीत तिच्या आईवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रजापती यांच्यावर आरोप आहे. 2014 मध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

विनयभंग झालेली ही मुलगी सध्या 'एम्स' रुग्णालयात डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली राहत आहे. कोणालाही तिला भेटण्यास मज्जाव आहे. आजही ही मुलगी रात्री शांतपणे झोपू शकत नाही. रात्री-अपरात्री मध्येच दचकून उठते व तिच्या वॉर्डमधून पळून जाण्याचा प्रयत्न करते. प्रजापतींचे लोक तिला रात्री शोधत येतील, अशी भीती तिला सतावते. प्रजापती यांना आता या प्रकरणात शिक्षा व्हावी आणि आईला न्याय मिळावा, अशी तिची प्रामाणिक इच्छा आहे. प्रजापती यांना आता कारागृहात पाहण्याची तिची इच्छा असल्याचे तिने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.