अनंतनागमध्ये "हिज्बुल'चा दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला घेराओ घातला होता. यावर असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी आहे

श्रीनगर - दक्षिण काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीमध्ये "हिज्बुल मुज्जाहिद्दीन' या संघटनेचा एक दहशतवादी ठार झाला असून यामध्ये एक स्थानिक नागरिकही मरण पावला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा भागातील कनिबाल येथे ही चकमक झाली.

या भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला घेराओ घातला होता अशी माहिती सूत्रांनी दिली. यावर असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी आहे.