चाचणीसाठी हॉवित्झर तोफा पोखरणमध्ये दाखल

पीटीआय
शनिवार, 27 मे 2017

या तोफांची चाचणी घेऊन विविध प्रकारचा दारूगोळा वापरण्यात येईल, त्यानंतर त्याचे विश्‍लेषण करण्यात येईल, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.

जयपूर : अमेरिकेतून आलेल्या दोन 777 हॉवित्झर तोफा चाचणीसाठी राजस्थानच्या पोखरणमध्ये दाखल झाल्या आहेत. पुढील दोन ते तीन महिने तेथे त्यांची चाचणी घेतली जाईल.

अमेरिकेच्या चमूसह दोन दिवसांपूर्वी या तोफा फायरिंग रेंजपर्यंत पोचल्या आहेत. या तोफांची चाचणी घेऊन विविध प्रकारचा दारूगोळा वापरण्यात येईल, त्यानंतर त्याचे विश्‍लेषण करण्यात येईल, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.

बीएई सिस्टीम मार्च 2019 पासून दर महिन्याला पाच तोफा या प्रमाणे 2021 च्या मध्यापर्यंत त्याचा पुरवठा करणार आहे. गेल्या वर्षी अमेरिकेबरोबर या तोफांसंदर्भात करार करण्यात आला होता. अमेरिकेकडून पाच हजार कोटी रुपयांच्या 145 हॉवित्ज्ञर तोफा खरेदी करण्यात येणार आहेत.