शंभर दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

पीटीआय
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमध्ये हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानी लष्कर सुमारे १०० दहशतवाद्यांना नियंत्रण रेषा पार करून भारतात घुसविण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकदरम्यान त्यांचे १२ लोक मारले गेल्याची कथितरीत्या कबुली एका पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्याने बुधवारी दिली. 

२९ सप्टेंबरच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानी लष्कराने निवडक नागरी भाग लक्ष्य करण्याशिवाय भारतीय संरक्षण कर्मचारी आणि सुरक्षेवर दहशतवाद्यांकडून हल्ले घडवून आणण्याची योजना बनविली आहे. 
दरम्यान, एका भारतीय दूरचित्रवाहिनीने आज त्यांच्या एका पत्रकाराने पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्याशी साधलेल्या संवादाचे प्रक्षेपण केले.

पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधील मिरपूरच्या पोलिस अधीक्षकाने या संवादादरम्यान सर्जिकल स्ट्राइकमध्ये १२ पाकिस्तानी मारले गेल्याचे नमूद केले. 

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत पाकिस्तानी लष्कर १०० दहशतवादी भारतात घुसविण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

देश

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्याची राजधानी असलेल्या श्रीनगर येथे एका पोलिस...

शुक्रवार, 23 जून 2017

नवी दिल्ली - वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी केंद्र स्तरावर घेण्यात येणाऱ्या नीट परिक्षेचा आज (शुक्रवार) निकाल जाहीर...

शुक्रवार, 23 जून 2017

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे...

शुक्रवार, 23 जून 2017