भारतात 'बुलेट ट्रेन' युगाची सुरवात : नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

अहमदाबादमध्ये कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी गेले तर भाव करतो. कर्ज घ्यायला गेले तरी दहा बँकांमध्ये चौकशी करून हिशोब करतो आणि निर्णय घेतो. पण, भारताला जपानासारखा मित्र मिळाला आहे. जपानने बुलेट ट्रेनसाठी 88 हजार कोटींचे 50 वर्षांसाठी कर्ज दिले असून, त्यावर 0.01 टक्के एवढे नाममात्र व्याज ठेवले आहे. बुलेट ट्रेन कधी आणणार असे म्हणत होते, आता अहमदाबादमध्येच असा प्रश्न उपस्थित करत आहेत. या हायस्पीड रेल्वेमुळे 500 किमी दूरीवर असलेले नागरिक एकत्र येऊ शकतील. मुंबई-अहमदाबादमधील अंतर दोन तासांवर येणार आहे.

अहमबादाबाद : आजपासून आधुनिक भारताची पायाभरणीस सुरवात झाली असून, ही बुलेट ट्रेन युगाची सुरवात आहे. या प्रकल्पामुळे भारताला एक विकासाची दिशा मिळणार आहे. बुलेट ट्रेनमुळे रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी निर्माण होणार असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

भारत आणि जपान यांच्या मैत्रीतून प्रत्यक्षात उतरलेल्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे भूमिपूजन आज (गुरुवार) जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्या हस्ते पार पडले. शिंजो अबे दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. बुलेट ट्रेन ही पर्यावरणाला पूरक आणि इंधनातही बचत होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.

मोदी म्हणाले, ''जपानच्या पंतप्रधानांचे आणि भारताच्या चांगल्या मित्राचे स्वागत करणाऱ्या गुजरातवासियांचे आभार. भारतात शिंजो अबे यांचे मन:पूर्वक स्वागत आहे. हा न्यू इंडिया आहे, याच्या स्वप्नांचे विस्तार असमित आहे. आपण स्वप्न पूर्ण होण्यासाठी मोठे पाऊल ठेवत आहोत. देशातील सव्वाशे कोटी नागरिकांना मी शुभेच्छा देत आहे. वेगवान प्रगती, गती आणि तंत्रत्रान यामुळे विकास वाढीस लागणार आहे. जपानने दाखवून दिले आहे, की ते भारताचे चांगले मित्र आहेत. या दोन्ही देशातील संबंधामुळे वाढ होणार आहे. अबे यांनी वैयक्तिकरित्या लक्ष देऊन बुलेट ट्रेनचा प्रकल्प पुढे नेला. अमेरिकेतही रेल्वेमुळे आर्थिक प्रगतीला सुरवात झाली. अबे यांनीही सांगितले, की दुसऱ्या महायुद्धानंतर 1964 मध्ये जपानमध्ये बुलेट ट्रेन सुरु झाली. यामुळे आर्थिक प्रगती झाली. तांत्रिक प्रगती गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झाली. हायस्पीड कनेक्टिव्हिटीमुळे आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होणार आहे. उत्पादकता वाढली तरच प्रगती होणार आहे. रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून, यापूर्वी कोणत्याही सरकारने एवढे रेल्वेसाठी केले नव्हते.  ''

अहमदाबादमध्ये कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी गेले तर भाव करतो. कर्ज घ्यायला गेले तरी दहा बँकांमध्ये चौकशी करून हिशोब करतो आणि निर्णय घेतो. पण, भारताला जपानासारखा मित्र मिळाला आहे. जपानने बुलेट ट्रेनसाठी 88 हजार कोटींचे 50 वर्षांसाठी कर्ज दिले असून, त्यावर 0.01 टक्के एवढे नाममात्र व्याज ठेवले आहे. बुलेट ट्रेन कधी आणणार असे म्हणत होते, आता अहमदाबादमध्येच असा प्रश्न उपस्थित करत आहेत. या हायस्पीड रेल्वेमुळे 500 किमी दूरीवर असलेले नागरिक एकत्र येऊ शकतील. मुंबई-अहमदाबादमधील अंतर दोन तासांवर येणार आहे. बुलेट ट्रेनमुळे मोठी इंधन बचत होणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून गरिबीविरुद्धची लढाई आपण जिंकू शकतो. देशातील सामान्य नागरिक याचा उपयोग करेल, तेव्हाच तंत्रज्ञानाचा वापर करेल. बुलेट ट्रेनसाठी अधिकाधिक सामुग्री भारतातून वापरली जाईल. नव्या तंत्रज्ञानामुळे मेक इन इंडिया प्रकल्पाला बळकटी मिळाली आहे. वडोदरामध्ये हायस्पीड रेल्वेसाठी विद्यापीठ सुरु करण्यात येईल, असे मोदी यांनी सांगितले.