ऑनलाईन शॉपिंगमुळे 'ती' सापडली अडचणीत!

वृत्तसंस्था
रविवार, 2 ऑक्टोबर 2016

भोपाळ : भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याच्या पत्नीने तब्बल दहा लाख रुपयांची ऑनलाईन शॉपिंग केल्याने पत्नीसह अधिकारी अडचणीत सापडले आहेत. प्राप्तिकर विभागाने या संदर्भात अधिकाऱ्याच्या पत्नीला नोटीस पाठविली आहे.

त्यांनी फार कमी कालावधीत तब्बल दहा लाख रुपयांची ऑनलाईन खरेदी केली असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. दरम्यान संबंधित अधिकाऱ्याच्या निकटवर्तीयाने अधिकाऱ्याच्या पत्नीला सतत खरेदी करण्याचा मानसिक आजार (Compulsive buying disorder) असल्याची माहिती दिली आहे. त्याचाच हा प्रतिकूल परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाईन शॉपिंगवर प्राप्तिकर विभागाचे लक्ष
ऑनलाईन शॉपिंगवर प्राप्तिकर विभाग बारकाईने लक्ष ठेवून असतो. त्यासाठी विभागाने एक विशेष सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रत्येक व्यक्तीच्या ऑनलाईन खरेदीवर लक्ष ठेवणे शक्‍य आहे. खरेदी करणाऱ्या व्यक्तीने भरलेल्या प्राप्तिकराशी पडताळणी करून त्यावर तातडीने कारवाई करण्याची सोयही या सॉफ्टवेअरमध्ये आहे.