भारत-पाक लष्कराची ध्वज बैठक

पीटीआय
बुधवार, 24 मे 2017

पाकिस्तानी लष्कराकडून यासाठी पुढाकार घेण्यात आला होता.

जम्मू : पाकिस्तानी लष्कर व सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांमध्ये आज एक ध्वज बैठक संपन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुचेतागड सेक्‍टरमध्ये पार पडलेल्या या बैठकीत सीमेवर शांतता कायम राखण्याचे आश्वासन दोन्ही बाजूंकडून देण्यात आले.

पाकिस्तानी लष्कराकडून यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. अर्णिया भागात नुकताच झालेला गोळीबार तसेच, सीमेवरील इतर प्रश्नांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती प्रवक्‍त्याने दिली.

किरकोळ बाबींवर मार्ग काढण्यासाठी फिल्ड कमांडर्समध्ये होत असलेला नियमित संवाद पूर्ववत सुरू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.