'बलात्काराच्या क्रमवारीत भारत शेवटून चौथा'

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- जगभरात होत असलेल्या बलात्काराच्या जागतीक क्रमवारीत भारताचा शेवटून चौथा क्रमांक लागत आहे, असे केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी म्हटले आहे.

महिला पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी गांधी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, 'जगामध्ये महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबतची आकडेवारी मिळविली आहे. या आकडीवारीनुसार जागतीक स्तरावर भारताचा शेवटून चौथा क्रमांक लागत आहे. यामध्ये स्विडनचा प्रथम क्रमांक आहे. दिल्लीत झालेल्या निर्भया अत्याचारा प्रकरणानंतर स्विडनचा दौरा केला होता. दौऱयावेळी भारतामध्ये येण्यास कोणीही इच्छुक नसल्याचे एकाने सांगितले.'

दरम्यान, गांधी यांनी जाहिर केलेल्या आकडेवारीनंतर सर्वच महिला पत्रकारांना धक्का बसला. परंतु, हि सत्य परिस्थिती असून आकडेवारी बोलत असल्याचे त्यांनी सांगितले.