जवानांना बनावट नोटा ओळखण्याचे ट्रेनिंग

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

भारत-बांगलादेश सीमेवरून बनावट नोटांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. याला आळा घालण्यासाठी जवानांना खोट्या नोटा ओळखण्याचे धडे दिले जाणार आहेत.

कोलकाता :L बनावट नोटांची तस्करी रोखण्यासाठी आता सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना खोट्या नोटा ओळखण्याचे प्रशिक्षण देण्याचा विचार सुरू आहे. याबाबत बीएसएफकडून रिझर्व्ह बॅंकेशी बोलणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भारत-बांगलादेश सीमेवरून बनावट नोटांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. याला आळा घालण्यासाठी जवानांना खोट्या नोटा ओळखण्याचे धडे दिले जाणार आहेत.

नोटाबंदीनंतर सीमेवर बनावट नोटांच्या तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्याने बीएसएफसमोरील चिंता वाढली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेची मदत घेऊन लवकरच एका प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 2015-2016 दरम्यान जवानांनी सुमारे 3 कोटी 96 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

Web Title: india to train soldiers to identify fake currency notes