लष्कराने वीरपत्नीला दिलेला चेक झाला 'बाऊन्स'

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

लखनौ- दहशतवाद्यांबरोबर दोन हात करत असताना वीरमरण आलेल्या जवानाच्या पत्नीला लष्कराने काही रक्कमेचा चेक दिला. परंतु, तो 'बाऊन्स' झाला आहे, अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली.

जम्मू-काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये 22 नोव्हेंबर 2016 रोजी दहशतवाद्यांनी जवानांच्या तुकडीवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत 3 जवान हुतात्मा झाले होते. यामध्ये उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील मनोज या जवानाचा समावेश होता.

जवान मनोज हे हुतात्मा झाल्यानंतर लष्कराने त्यांची पत्नी मंजू यांना एक लाख 88 हजार 520 रुपयांचा चेक देण्यात आला होता. मंजू यांनी त्यांच्या बॅंकेतील खात्यावर तो चेक भरला होता. काही दिवस उलटून गेल्यानंतरही आपल्या खात्यावर रक्क्म जमा न झाल्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता तो चेक बाऊन्स झाल्याचे समजले.

'सरकारने गॅस एजन्सी देण्याचे मला सांगण्यात आले होते, ती सुद्धा अद्याप मिळालेली नाही. पेन्शनही सुरू झाली नाही. माझे पती कुटुंबामध्ये एकमेव कमावते होते. माझ्यावर दोन मुंलाची जबाबदारी आहे. पैसे नसल्यामुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे,' असे मंजू यांनी सांगितले.

'लष्कराने दिलेला चेक बाऊन्स झाल्यानंतर संबंधित अधिकाऱयांना अनेकदा भेटलो. परंतु, कोणताही अधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. भाऊ हुतात्मा झाल्यानंतर मोठ-मोठी आश्वासने देण्यात आली होती. परंतु, ती केवळ कागदावरच राहिली आहेत,' असे हुतात्मा जवान मनोज यांचा भाऊ मोहन यांनी म्हटले आहे.