घुसखोरीचा डाव उधळला; दहा दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली : उरीमधील लाछीपोरा या भागातून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या किमान आठ दहशतवाद्यांना लष्कराने आज (मंगळवार) कंठस्नान घातले. उरीमधील प्रत्यक्ष ताबारेषेजवळून 10 ते 15 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत होते. इतर दहशतवादी आणि लष्करामधील चकमक अजूनही सुरू आहे.

उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर दोनच दिवसांनी आज दुपारी पाकिस्तानच्या लष्कराने प्रत्यक्ष ताबारेषेवर पुन्हा गोळीबार केला. पाकिस्तानच्या सैनिकांनी भारतीय जवानांच्या ठाण्यांना लक्ष्य केले. घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना ‘कव्हर‘ करण्याच्या हेतूने हा गोळीबार केल्याचे मानले जात आहे. 

या गोळीबारामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. दुपारी 1.10 ते 1.30 या कालावधीमध्ये हा गोळीबार झाला. उरी येथे लष्कराच्या तळावर झालेल्या दशतवादी हल्ल्याचा संपूर्ण जगातून निषेध होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने पुन्हा ही आगळीक केली आहे. 

रविवारी उरीत झालेल्या हल्ल्यात 18 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांत तणाव निर्माण झाला आहे.