सैनिक चंदू चव्हाण यांना दोन महिन्यांची शिक्षा

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

चंदू चव्हाण यांच्यावर लष्करी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने जानेवारी २०१७ मध्ये भारताच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर त्यांच्यावर लष्करी न्यायालयात कोर्ट मार्शलद्वारे सुनावणी करण्यात आली.

नवी दिल्ली : ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर २०१६ मध्ये भारत- पाकिस्तान सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेले लष्करी जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांना लष्करी न्यायालयाने दोन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

चंदू चव्हाण यांच्यावर लष्करी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने जानेवारी २०१७ मध्ये भारताच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर त्यांच्यावर लष्करी न्यायालयात कोर्ट मार्शलद्वारे सुनावणी करण्यात आली.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राजस्थानमध्ये सीमेवर तैनात असताना चंदू चव्हाण पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. पाकिस्तानने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. अखेर भारताला त्यांना परत आणण्यात यश आले होते.