केजरीवालांवर 'शाई हल्ला'; दोन अटकेत

वृत्तसंस्था
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

बिकानेर - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा राजस्थानमधील बिकानेर येथे शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बिकानेर - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मंगळवारी रात्री उशिरा राजस्थानमधील बिकानेर येथे शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

केजरीवालांवर शाई फेकणाऱ्यांचा उद्देश अद्याप समजलेला नाही. मात्र या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना केजरीवाल यांनी "ज्यांनी माझ्यावर शाई फेकली आहे देव त्यांचे भले करो. मी त्यांचे भले चिंततो‘ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भारताने केलेल्या लक्ष्यवेधी हल्ल्याचे पुरावे मागितल्याने केजरीवाल यांच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात येत होती. "तुमचा लष्करावर विश्‍वास नाही का‘, असा प्रश्‍न उपस्थित करत पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या अपप्रचाराला भुलू नका, असा सल्ला भारतीय जनता पक्षाने दिला आहे. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही "सर्जिकल स्ट्राईक‘चे पुरावे मागणे चुकीचे असल्याचे म्हणत केजरीवालांवर टीका केली आहे.