इस्रो शुक्रवारी अवकाशात सोडणार 31 उपग्रह

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

चेन्नई - जीएसएलव्ही एमके-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आता येत्या शुक्रवारी "पीएसएलव्ही'च्या सहाय्याने तब्बल 31 उपग्रह अवकाशात सोडणार आहे.

चेन्नई - जीएसएलव्ही एमके-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आता येत्या शुक्रवारी "पीएसएलव्ही'च्या सहाय्याने तब्बल 31 उपग्रह अवकाशात सोडणार आहे.

या उपग्रहांमध्ये तब्बल 14 देशांच्या 29 "नॅनो उपग्रहां'चा समावेश आहे. या उपग्रहांसमवेतच इस्रो कार्टोसॅट 2 ई हा उपग्रहही प्रक्षेपित करणार आहे. कार्टोसॅट 2 ई हा "पृथ्वी निरीक्षणा'साठी अवकाशात सोडण्यात येणार आहे. 712 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह कार्टोसॅट 2 या उपग्रहांच्या मालिकेमधील सहावा उपग्रह आहे.

याशिवाय, तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यामधील नूरुल इस्लाम विद्यापीठामधील विद्यार्थ्यांनी तयार केलेला एक उपग्रहही याचवेळी अवकाशात सोडण्यात येणार आहे.

या देशांचे उपग्रह इस्रो प्रक्षेपित करणार -
ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिले, झेक प्रजासत्ताक, फिनलॅंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, लात्विया, लिथुआनिया, स्लोव्हाकिया, ब्रिटन आणि अमेरिका