इंदिरा गांधी पुरस्काराचे "इस्रो'ला वितरण

पीटीआय
शुक्रवार, 19 मे 2017

मंगळ मोहीम तसेच अवकाशसंबंधी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल इस्रोला हा पुरस्कार देण्यात आला. जयपूर लघू चित्रकलेच्या परंपरेनुसार करंडकामध्ये इंदिरा गांधी यांचे चित्र तयार करण्यात आले आहे

नवी दिल्ली - भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो)ला आज 2014च्या इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 2014 मध्ये या पुरस्काराची घोषणा केली होती. एक करंडक, एक कोटी रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. इस्रोचे अध्यक्ष किरण कुमार यांनी संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.

मंगळ मोहीम तसेच अवकाशसंबंधी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल इस्रोला हा पुरस्कार देण्यात आला. जयपूर लघू चित्रकलेच्या परंपरेनुसार करंडकामध्ये इंदिरा गांधी यांचे चित्र तयार करण्यात आले आहे. यापूर्वी हा पुरस्कार अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर, नामीबियाचे नेते साम नुजोमा, केनियाचे पर्यावरणवादी वांगरी माथाई आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांना देण्यात आला आहे.

देश

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले...

01.45 PM

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला....

12.06 PM

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

07.06 AM