'तो' व्हिडिओ सार्वजनिक करणे अयोग्य: खान

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

"सर्जिकल स्ट्राईक‘चा व्हिडिओ सार्वजनिक करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी व्यक्त केल्या आहेत.

रामपूर (उत्तर प्रदेश) - उरी हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर भारताने पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक‘चा व्हिडिओ सार्वजनिक करणे योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी व्यक्त केल्या आहेत.

वृत्तसंस्थेशी बोलताना खान म्हणाले, "सर्जिकल स्ट्राईकचे व्हिडिओ सार्वजनिक करण्याची योग्य नसल्याचे मला वाटते. यापूर्वीही "सर्जिकल स्ट्राईक‘ झाली होती. मात्र त्याचे व्हिडिओ सार्वजनिक करण्यात आलेले नव्हते. आपण अशा प्रकारच्या हल्ल्यांची प्रसिद्धी करू नये.‘ "सर्जिकल स्ट्राईक‘ झाली नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. विशेष म्हणजे राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह कॉंग्रेस नेते संजय निरूपम यांनीही "सर्जिकल स्ट्राईक‘बद्दल प्रश्‍न उपस्थित करत पुराव्याची मागणी केली आहे. लष्कराने या संपूर्ण कारवाईचे छायाचित्रण केले आहे. त्यानंतर लष्कराने बुधवारी हे व्हिडिओ सरकारकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. हे व्हिडिओ लष्कराने सरकारकडे सोपविण्याची प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी बुधवारी दिली.