'जल्लिकट्टू'चे दोन दिवसात आयोजन- पनीरसेल्वम

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

चेन्नई- तमिळनाडूत 'जल्लिकट्टू' या क्रीडाप्रकाराच्या समर्थनार्थ सुरू झालेले आंदोलन नागरिकांनी थांबवावे, पुढील दोन दिवसांत 'जल्लिकट्टू'चे आयोजन केले जाईल, असे तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी आज (शुक्रवार) सांगितले.

तमिळनाडूत "जल्लिकट्टू' या क्रीडाप्रकाराच्या समर्थनार्थ सुरू झालेले आंदोलन दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. पनीरसेल्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पनीरसेल्वम म्हणाले, 'तमिळनाडूमध्ये पुढील दोन दिवसात 'जल्लिकट्टू'चे केले जाईल. याबाबतचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठविला असून काही औपचारिकता बाकी आहेत. 'जल्लिकट्टू'ला लवकरच मान्यता मिळणार आहे. राज्यातील जनतेला आवाहन करतो की त्यांनी शांतता पाळून आंदोलन मागे घ्यावे.'

द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) या पक्षाने आज राज्यभर रेल रोको करणार असल्याचे घोषणा केली आहे. या आंदोलकांनी नागरिकांनी पाठिंबा दर्शविला आहे.

दरम्यान, तमिळनाडूत दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचा वणवा पेटला असून, हजारो लोक या क्रीडाप्रकाराच्या समर्थनार्थ रस्त्यांवर उतरले आहेत. मदुराईमधील मध्यवर्ती तुरुंगात पाचशे श्रीलंकन कैद्यांनी उपोषण केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. वकिलांनीही न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

देश

लखनौ : उत्तर प्रदेशात अरैया येथे आज (बुधवार) पहाटे कैफियत एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 50 जण जखमी आहेत....

08.18 AM

नवी दिल्ली: "ब्लू व्हेल'प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेसबुक, गुगल आणि याहू या कंपन्यांच्या भारतातील केंद्रांना...

07.27 AM

लखनौ: मुस्लिम समाजातील तोंडी तलाक घटनाबाह्य ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उत्तर प्रदेशच्या सरकारने स्वागत केले...

06.03 AM