काश्‍मीरबाबत केंद्रीय गृह सचिवांची मुफ्तींशी चर्चा

पीटीआय
शुक्रवार, 12 मे 2017

श्रीनगर : केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी यांनी आज जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली आणि राज्यातील सुरक्षा परिस्थितीसंबंधी चर्चा केली.

दहशतवाद्यांनी शोपियॉं जिल्ह्यात एका युवा काश्‍मिरी लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण करून हत्या केल्यानंतर एक दिवसाच्या भेटीसाठी महर्षी यांचे आज सकाळी येथे आगमन झाले. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी राज्यपाल एन. एन. व्होरा यांचीही भेट घेतली. त्याशिवाय महर्षी यांनी पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांच्यासह वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि राज्यातील विशेषत: काश्‍मीर खोऱ्यातील सुरक्षा परिस्थितीविषयी माहिती घेतली.

मुफ्ती यांच्याबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान महर्षी यांनी राज्यातील एकूणच परिस्थितीविषयी चर्चा केली, अशी माहिती एका अधिकृत प्रवक्‍त्याने दिली.

श्रीनगर लोकसभा मतदारसंघासाठी 9 एप्रिल रोजी झालेल्या पोटनिवडणुकीपासून जम्मू आणि काश्‍मीरमध्ये हिंसाचाराचे वातावरण असून, 200पेक्षा अधिक घटनांमध्ये आठ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. परिणामी, निवडणूक आयोगाला 25 मे रोजी होणारी अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक रद्द करावी लागली आहे. विद्यार्थी आणि पोलिसांदरम्यान संघर्षाचे अनेक प्रसंग उद्‌भवले असून, सुरक्षा कर्मचाऱ्यांना दगडफेकीचा सामना करावा लागला आहे.

देश

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला....

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017