काश्मिरमध्ये सुरक्षा दलांच्या गोळीबारात मुलाचा मृत्यू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 जुलै 2017

श्रीनगरः बडगाम जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणेच्या जवानांवर दगडफेक करणाऱ्या काश्‍मिरी तरुणांना हुसकावताना केलेल्या गोळीबारात एका 18 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

श्रीनगरः बडगाम जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणेच्या जवानांवर दगडफेक करणाऱ्या काश्‍मिरी तरुणांना हुसकावताना केलेल्या गोळीबारात एका 18 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बिरवाह येथे निदर्शने करणाऱ्या जमावाने आज दुपारी लष्कराच्या वाहनांवर दगडफेक करण्यास सुरवात केल्यानंतर जवानांनी त्यांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. या कारवाईत दोन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तनवीर अहमद वणी याचा मृत्यू झाला असून, दुसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, तनवीरच्या मृत्यूनंतर बिरवाह येथे तणावाची स्थिती निर्माण झाली असून, तेथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

जनजीवन अद्याप विस्कळितच
सुरक्षा यंत्रणेच्या कारवाईत स्थानिकाचा मृत्यू झाल्यानंतर फुटीरवाद्यांनी ठिकठिकाणी निदर्शने सुरू केली आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहर ए खास व इतर काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नुकत्याच सुरू झालेल्या शाळा व विद्यालये तसेच, रेल्वेसेवा तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तणावाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्य बाजारपेठेतही आज शुकशुकाट दिसून आला.