बेकायदा स्थलांतरितांना हाकलून द्या : "जेकेएनपीपी'

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

कारवाईस सरकारला अपयश आल्याचा आरोप

जम्मू: जम्मूमध्ये बेकायदा घुसलेल्या म्यानमार आणि बांगलादेशच्या स्थलांतरितांना त्वरित हाकलून द्यावे, अशी मागणी जम्मू आणि काश्‍मीर राष्ट्रीय पॅंथर्स पार्टीने (जेकेएनपीपी) केली आहे. या मागणीसाठी पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या बेकायदा स्थलांतरितांवर कारवाई करण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

पक्षाचे कार्याध्यक्ष हर्षदेव सिंग म्हणाले, ""हजारो रोहिंग्या मुस्लिम आणि बांगलादेशी नागरिक जम्मूच्या विविध भागांत बेकायदा घुसले आहेत. त्यांचे वागणे उर्मटपणाचे असून, त्यांचा या प्रदेशाला गंभीर धोका आहे. त्यांच्या घुसखोरीमुळे स्थानिक नागरिकांना आलेल्या नैराश्‍याचा स्फोट होऊ शकतो. या प्रश्‍नावर वेळीच पाऊल उचलण्यास केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे.''

"या लोकांचे येथे येणे हा जम्मूचा भौगोलिक नकाशा बदलण्याचा मोठा कट असल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे. ""उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांच्या नेतृत्वाखाली गेल्या मे महिन्यात आलेल्या उच्चपदस्थ पथकातील सदस्यांच्या डोळ्यात अंजन घातले होते. त्यानंतरही या बेकायदा स्थलांतरितांवर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. या स्थलांतरितांनी पक्की घरे बांधून येथील पाणी, वीज आदी नागरी सुविधांचा लाभ घेत आहेत. त्यांनी आधार कार्ड आणि स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी तसेच राज्यातील काही दाखलेही मिळवले आहेत,'' असा दावा त्यांनी केला.