जम्मू-काश्‍मिर: पाकच्या गोळीबारात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 8 जुलै 2017

पूँच (जम्मू-काश्‍मिर) - जम्मू-काश्‍मिरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचा भंग करत केलेल्या गोळीबारात पूँच येथे एकाच कुटुंबातील दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी पाकिस्तानने केलेल्या छोट्या शस्त्रांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पती-पत्नीचा मृत्यू झाला. तर त्यांची मुले जखमी झाली. शनिवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. त्याआधी बांदीपूरा  येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत.