भारत सोडायला तिबेटींना सांगणार का? उमर अब्दुल्लांचा सवाल

वृत्तसंस्था
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

श्रीनगर : "रोहिंग्या मुस्लिमांना देशातून हाकलून लावण्याची भाषा करणारे लोक भारतामध्ये राहणाऱ्या तिबेटी सरकारला देश सोडण्यास सांगणार का,' असा प्रश्‍न नॅशनल कॉन्फरन्सचे कार्यकारी अध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी विचारला आहे.

"भारत केवळ भारतीयांसाठी' असे म्हणणारे नागरिक, राजीव गांधींच्या हत्येची शिक्षा म्हणून भारतात आश्रयाला आलेल्या तमिळ निर्वासितांना जाण्यास सांगणार का, असेही अब्दुल्ला यांनी "ट्विटर'द्वारे विचारले आहे. "इतर देशातील नागरिकांबाबत असलेला द्वेष सर्वसमावेशक असेल तर दलाई लामा यांना त्यांच्या या दत्तक घरामध्ये नकोसे वाटू लागेल. भारतीयांसाठी भारत असे म्हणणारे लोक येथे विजनवासात राहणाऱ्या तिबेटी सरकारला, त्यांच्या नागरिकांना तत्काळ देश सोडण्यास सांगणार का? आणि राजीव गांधींच्या हत्येबाबत शिक्षा म्हणून भारतात निर्वासित म्हणून राहत असलेल्या तमिळींना परत श्रीलंकेत पाठविणार का?,' असे उमर यांनी ट्विटरवर विचारले आहे. भारतात राहणारे रोहिंग्या मुस्लिम हे देशासाठी धोकादायक असल्याचे सांगणाऱ्या केंद्र सरकारवरही उमर अब्दुल्ला यांनी टीका केली. रोहिंग्यांबाबतचा असा कोणताही अहवाल 2014 पर्यंत आला नव्हता, असे अब्दुला यांनी दावा केला आहे.