पाकच्या गोळीबारात आणखी एक जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

जम्मू/नवी दिल्ली- भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाला आहे.

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबाराला सुरवात केली. भारतीय जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी दोन्ही बाजूंनी होत असलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान जखमी झाले. यातील एका जवानाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जवानाचे नाव समजू शकलेले नाही. या गोळीबारात पाकिस्तानचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

'पाकिस्तानने सकाळी 8.45 वाजता शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबाराला सुरवात केली. दोन्ही बाजूंनी अद्यापही गोळीबार सुरू आहे,' असे वरिष्ठ लष्करी अधिकाऱयांनी सांगितले.

दरम्यान, भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने तब्बल 99 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात रविवारी (ता. 6) दोन जवान हुतात्मा झाले होते. यामध्ये कोल्हापूरच्या राजेंद्र तुपारे यांचा समावेश होता.