वैमानिकाकडून महिलेचा विनयभंग; हरभजनसिंगचा दावा

पीटीआय
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई- जेट एअरवेजच्या विमानामध्ये एका वैमानिकाने महिलेचा विनयभंग केला आहे, असा दावा क्रिकेटपटू हरभजनसिंग याने ट्विटरच्या माध्यमातून आज (बुधवार) केला आहे.

मुंबई- जेट एअरवेजच्या विमानामध्ये एका वैमानिकाने महिलेचा विनयभंग केला आहे, असा दावा क्रिकेटपटू हरभजनसिंग याने ट्विटरच्या माध्यमातून आज (बुधवार) केला आहे.

हरभजनसिंगने ट्विटवरून म्हटले आहे की, 'एका वैमानिकाने महिलेचा विनयभंग करतानाच अश्लिल वक्तव्य केले आहे. शिवाय, एका अपंग नागरिकासोबतही त्याने गैरवर्तन केले आहे. यामुळे त्या वैमानिकावर कडक कारवाई करण्यात यावी.'

देशात अनेक गोष्टी दाबल्या जातात. परंतु, अशा गोष्टींवर कडक कारवाई करायला हवी, असेही हरभजनसिंगने म्हटले आहे. जेट एअरवेजच्या प्रवक्त्यांनी याबाबतीत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.