झारखंड: फटाक्‍यांच्या कारखान्यात भडकली आग; 8 मृत्युमुखी

वृत्तसंस्था
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

घटनास्थळी मदतकार्यास प्रारंभ करण्यात आला असून अद्यापी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हे गाव जमशेदपूरपासून सुमरे 85 किमी अंतरावर आहे

रांची - झारखंड राज्यातील पूर्व सिंघभूम जिल्ह्यामधील कुमारदुबी या गावामध्ये एका बेकायदेशीर फटाक्‍यांच्या कारखान्यामध्ये लागलेल्या आगीमुळे किमान 8 जण मृत्युमुखी पडले. या घटनेमध्ये किमान 25 जण जखमी झाले.

घटनास्थळी मदतकार्यास प्रारंभ करण्यात आला असून अद्यापी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हे गाव जमशेदपूरपासून सुमरे 85 किमी अंतरावर आहे.

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) येथील स्थानिक खासदार बिद्युत बरन महातो यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला.