गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात महिलांनी धुतले झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचे पाय

वृत्तसंस्था
रविवार, 9 जुलै 2017

जमशेदपूर (झारखंड) : गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात महिलांनी झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांचे पाय धुतल्याची घटना समोर आली आहे.

जमशेदपूर (झारखंड) : गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात महिलांनी झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांचे पाय धुतल्याची घटना समोर आली आहे.

जमशेदपूर येथील ब्रह्म लोक धाम येथे गुरुपौर्णिमेनिमित्त "गुरु महोत्सव' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी दास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर दास यांच्या स्वागत करताना उपस्थित महिलांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. नंतर फुले असलेल्या एका ताटात दास यांना उभे करून महिलांनी त्यांचे पाय धुतले. या प्रकारावर विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. या कार्यक्रमाचे काही छायाचित्रे दास यांनी ट्विटरद्वारे शेअर केली आहेत.