पूंछ: दोन जवान हुतात्मा; दोन घुसखोर ठार

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 जून 2017

कुपवाडा व पुलावामा या भागांमध्ये झालेल्या दोन चकमकींमध्ये भारतीय लष्कराने पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडल्यानंतर काही तसांतच ही चकमक घडली आहे. या प्रकरणी सविस्तर माहितीची अद्यापी प्रतीक्षा आहे

श्रीनगर - जम्मु काश्‍मीर राज्यामधील पूंछ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ आज (गुरुवार) पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे दोन जवान हुतात्मा झाले.

लष्करानेही प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात भारतीय भूभागामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणारे दोन घुसखोर ठार झाले. या ठिकाणी अद्यापी चकमक सुरु आहे.

कुपवाडा व पुलावामा या भागांमध्ये झालेल्या दोन चकमकींमध्ये भारतीय लष्कराने पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडल्यानंतर काही तसांतच ही चकमक घडली आहे. या प्रकरणी सविस्तर माहितीची अद्यापी प्रतीक्षा आहे.