जेएनयूतून विद्यार्थी बेपत्ता; कुलगुरुंना कोंडले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

जेएनयूतील नजीब अहमद हा विद्यार्थी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी शोध घेणाऱ्याला बक्षीसही जाहीर केले आहे. अभाविपच्या एका कार्यकर्त्याशी त्याचा वाद झाला होता, तेव्हापासून तो बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून (जेएनयू) एक विद्यार्थी बेपत्ता असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरुंविरोधात आंदोलन करत कुलगुरुंसह अन्य अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडून ठेवले.

जेएनयूतील नजीब अहमद हा विद्यार्थी गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी शोध घेणाऱ्याला बक्षीसही जाहीर केले आहे. अभाविपच्या एका कार्यकर्त्याशी त्याचा वाद झाला होता, तेव्हापासून तो बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेएनयूचे कुलगुरु एम. जगदीश कुमार यांनी सुटका झाल्यानंतर सांगितले, की या प्रशासकीय इमारतीत आम्हाला बुधवारी दुपारी अडीचपासून कोंडून ठेवण्यात आले. आमच्या कार्यालयातील एका महिलेला मधुमेहाचा विकार असून, त्या अस्वस्थ झाल्या होत्या. 

दुसरीकडे जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष मोहित पांडेने सांगितले, की आम्ही अवैधरित्या कोणालाही कोंडून ठेवले नव्हते. आम्ही कार्यालयातील अधिकाऱ्यांना जेवणही पुरविले. 

टॅग्स