अखेर न्याय मिळाला- निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया

टीम ई सकाळ
शुक्रवार, 5 मे 2017

राजधानी दिल्लीतील निर्भयावर अत्यंत निर्घृण बलात्कार व खून झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. या निकालावर देशातील अनेक मान्यवर व तज्ज्ञांनी ही शिक्षा योग्य असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

निर्भया बलात्कार प्रकरणाचा निकाल न्यायाधीशांनी देताच संपूर्ण कोर्ट रूम टाळ्यांचा कडकडाट झाला. कोर्टासंबंधीची पत्रकारिता करत असताना असे चित्र आपण पहिल्यांदाच पाहिलं, असं एका पत्रकाराने सांगितलं. 

अखेर न्याय दिला गेला. 
- निर्भयाची आई

माझ्या कुटुंबासाठी हा एक विजय आहे. न्यायालयाच्या निकालावर मी खूश आहे
- निर्भयाचे वडील.

दिल्ली पोलिसांचे तपास कार्य निःसंशय सिद्ध झाले आहे. हा एक महत्त्वपूर्ण निकाल आहे.
- दीपेंद्र पाठक, (प्रवक्ते, दिल्ली पोलिस)

मुले महिलांचा आदर करायला शिकतील असे पद्धतशीर शिक्षण दिले गेले पाहिजे.
- न्यायाधीश भानुमती 

न्यायासाठी समाजाने उठवलेल्या आवाजाला उत्तर मिळालं. मृत्युदंड हीच एकमेव योग्य शिक्षा आहे. 
- अॅड. सिद्धार्थ लुथरा, सरकारी वकील

तात्त्विक दृष्टिकोनातून मी फाशीच्या शिक्षेविरोधात आहे. परंतु, अशा निर्घृण गुन्ह्याला कठोरातील कठोर शिक्षा देणे आवश्यक होते. 
- वृंदा करात, (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष) 

एक खणखणीत संदेश देण्याची गरज होती. बलात्काराची मानसिकता असणाऱ्यांनाही हा संदेश गेला पाहिजे. मृत्युंदडाची शिक्षा योग्य आहे. ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याबद्दल मी खूश आहे. सर्व पुराव्यांसह ही केस मजबूत होती.
- आभासिंह

हा निकाल यापूर्वीच लागायला हवा होता. परंतु, आधीचा फाशीचा निर्णय कायम ठेवल्याचा आनंद आहे. 
- मनेका गांधी, भाजप नेत्या
 
Web Title: justice done, people reacting on nirbhaya case verdict