पत्नीचे बहिणीशीच लैंगिक संबंध

Kanpur man claims wife in lesbian relationship with his cousin
Kanpur man claims wife in lesbian relationship with his cousin

कानपूर- कानपूरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाचे पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसांमध्येच आपल्या पत्नीचे आपल्याच बहिणीशी लैंगिक संभध असल्याचे त्याला समजले आहे. त्याची पत्नी लेस्बियन आहे. पतीने तक्रारीत म्हटले आहे की, त्याच्या पत्नीचे माझ्या चुलत बहिणीशी लैंगिक संबंध आहेत. पत्नी बहिणीच्या संपर्कात आल्यापासून आमच्यातील लैंगिक संबंध संपुष्टात आले. पत्नी माझ्याकडे दुर्लक्ष करते, ती जास्त वेळ माझ्या चुलत बहिणीसोबतच असते, असे त्याने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वीच सुप्रीम कोर्टाने समलैंगिक संबंध गुन्हा ठरत नाही, असा निर्णय दिला होता. त्यातच आता ही तक्रार कानपूर पोलिसाकडे आली आहे. कानपूर पोलिसांकडे पतीने तक्रार दिली आहे की, माझी पत्नी लेस्बियन असून तिचे माझ्या चुलत बहिणीशीच संबंध आहेत, तिच्यासाठी पत्नी माझ्याकडे दुर्लक्ष करते, असा आरोप त्याने केलेल्या तक्रारीत केला आहे.

दोघींमधील संबंधांची माहिती कुटुंबियांना तसेच परिसरातील इतर लोकांनाही समजल्याने या प्रकणाची आता चर्चा होऊ लागली आहे. तरी देखील दोघींमधील संबंध कायम आहेत. पत्नीचे बहिणीशीच संबंध असल्याचे माहित असूनही पती तिच्यासोबत राहायला तयार झाला. मात्र, बहिणीने भावालाच धमकावले आहे. आम्हाला सोडून दे, तू दुसरे लग्न कर, असे तिने भावाला सांगितले आहे. या संदर्भात पोलिस पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com