कानपूर रेल्वे अपघात प्रकरणी 'ISI' एजंट अटकेत

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

नेपाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तो दुबईहून काठमांडूमध्ये आला होता. आयएसआय हस्तक शमशुल हुदा याच्यासह अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे.

काठमांडू - कानपूरजवळ झालेल्या रेल्वे अपघातप्रकरणी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना 'आयएसआय'च्या हस्तकाला काठमांडूमधून अटक करण्यात आली आहे. 

नेपाळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तो दुबईहून काठमांडूमध्ये आला होता. आयएसआय हस्तक शमशुल हुदा याच्यासह अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे. रॉ, आयबी आणि एनआयएचे अधिकारी हुदाची चौकशी करत आहेत.

दुबईतून तो नेपाळ आणि भारतातील आपल्या हस्तकांच्या संपर्कात होता. हुदाचा कानपूरजवळ झालेल्या रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात हात असल्याचा संशय आहे. या अपघातात 150 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. भारतीय अधिकारी नेपाळ पोलिसांच्या संपर्कात असून, लवकरच हुदाला भारतात आणण्यात येणार आहे.