मी मेलो तरी केजरीवालांना फरक पडणार नाही : कपिल मिश्रा

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाला मिळालेल्या पदरेशी निधीबाबत माहिती जाहीर करण्याच्या मागणीसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलेले नेते कपिल मिश्रा उपोषणाला बसले आहेत. 'माझा मृत्यू झाला तरी केजरीवालांवर काहीही परिणाम होणार नाही. मात्र हे प्रकरण देशाच्या चिंतेचा विषय आहे', अशा प्रतिक्रिया मिश्रा यांनी यावेळी व्यक्त केल्या.

प्रसारमाध्यमांशी बोलताना मिश्रा म्हणाले, 'आप मधील काही ज्येष्ठ नेत्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवास खर्चाबाबत माहिती मिळेपर्यंत मी 'सत्याग्रह'ला करणार आहे. हे धरणे नसून सत्याग्रह आहे. 'आप'चे नेते सत्येंद्र जैन, आशिष खेतान, राघव चढ्ढा, संजय सिंह आणि दुर्गेश पाठक यांच्या परदेशी दौऱ्याची माहिती जाहीर करावी, असा संदेश अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोचवायचा आहे.' आपल्या मृत्यूचा केजरीवालांवर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावाही मिश्रा यांनी केला. ते म्हणाले, 'मला माहिती आहे की जर माझा मृत्यू झाला तर त्यांच्यावर (केजरीवाल) काहीही परिणाम होणार नाही. हे प्रकरण संपूर्ण देशाच्या चिंतेचा विषय आहे. तुम्ही म्हणता की तुमच्याकडे निवडणूक लढविण्यासाठीही पैसे नाहीत. मग विदेश दौऱ्यासाठी पैसे कोठून आले. याबाबतची माहिती देण्यास केवळ पाच मिनिटांचा वेळ लागेल. मी तुमच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत आहे.'

आंतरराष्ट्रीय क्रमांकावर जीवे मारण्याच्या धमक्‍या येत असल्याचा दावाही मिश्रा यांनी यावेळी केला.

Web Title: Kapil Mishra begins 'Satyagraha'