करण जोहर घेणार राजनाथसिंहांची भेट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

काश्‍मीरमधील उरी येथील हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना मुंबईत राहण्यास विरोध केला होता. शहरातील कायदा व सुव्यवस्था पाहून मुंबई पोलिसांनी मनसेच्या अमेय खोपकर यांना नोटीस बजावली होती. त्यातच करण जोहरच्या "ऐ दिल है मुश्‍किल‘ या आगामी चित्रपटास मनसेने विरोध केला.

नवी दिल्ली - करण जोहर निर्मित "ऐ दिल है मुश्‍किल‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आज (गुरुवार) करण केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेणार आहे.

करण व चित्रपट निर्मात्यांनी सुरक्षा पुरवण्याची मागणी मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे केली होती. आयुक्तांनी त्यांना तसे आश्‍वासनही दिले. यावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने नाराजी व्यक्त केली होती. अखेर करण राजनाथसिंह यांची भेट घेऊन चित्रपट प्रदर्शित करावा, अशी मागणी करणार आहे. 

काश्‍मीरमधील उरी येथील हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तानी कलाकारांना मुंबईत राहण्यास विरोध केला होता. त्यावरून चांगलेच राजकारण पेटले होते. शहरातील कायदा व सुव्यवस्था पाहून मुंबई पोलिसांनी मनसेच्या अमेय खोपकर यांना नोटीस बजावली होती. त्यातच करण जोहरचा आगामी चित्रपट "ऐ दिल है मुश्‍किल‘ला मनसेने विरोध केला. हा चित्रपट प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.

पाक कलाकारांसोबत काम बंद - करण जोहर 

माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा हा देश आहे. त्यानंतरच इतर गोष्टी आहेत, असे निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने म्हटले आहे. त्याने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. "यापुढे मी कोणत्याही पाकिस्तानी कलाकारासोबत काम करणार नाही; पण लवकरच प्रदर्शित होणाऱ्या "ऐ दिल है मुश्‍किल‘ चित्रपटाला लक्ष्य करू नका,‘ अशी विनंती करून तो म्हणतो की, तीनशेहून अधिक भारतीयांनी या चित्रपटासाठी कठोर मेहनत घेतली आहे. असे असताना इतर भारतीयांकडून होणारा हा विरोध त्यांना न्याय देईल का, हे मला समजत नाही''.

देश

बंगळूर - गरिबांमधील गरिबांना परवडेल अशा दरात अन्न पुरविण्यासाठी "इंदिरा कॅंटिन'चे...

05.36 PM

गोरखपूर - नेपाळमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे उत्तर प्रदेशमधील रापती व रोहिणी...

04.09 PM

नवी दिल्ली - भारत-चीन सीमारेषेवरील पूर्व लडाख भागामध्ये भारतीय लष्कर व चिनी...

02.24 PM