कॉंग्रेसच्या आमदाराचा अपघाती मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

कर्नाटकातील कॉंग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री सिद्दू न्यामगौडा (वय 69) यांचा आज सकाळी मोटार अपघातात मृत्यू झाला. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ते जामखंडी मतदारसंघातून निवडून आले होते. 

बंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेसचे नवनिर्वाचित आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री सिद्दू न्यामगौडा (वय 69) यांचा आज सकाळी मोटार अपघातात मृत्यू झाला. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ते जामखंडी मतदारसंघातून निवडून आले होते. 

न्यामगौडा हे आज सकाळी गोवा येथून मोटारीने बागलकोटमधील निवासस्थानी परतत होते. त्या वेळी त्यांच्या मोटारीला तुलसीगिरी येथे एका ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या न्यामगौडा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. न्यामगौडा हे दिल्लीला गेले होते. तेथून विमानाने ते गोव्याला आले. गोव्याहून ते मोटारीने घरी परतत असतानाच अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

न्यामगौडा यांनी भाजपचे उमेदवार श्रीकांत सुब्बराव कुलकर्णी यांचा 2500हून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला होता. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात ते मंत्री होते.

Web Title: Karnataka Congress MLA Siddu Nyama Gowda dies in road accident near Tulasigeri