मोबाईलमध्ये अश्लिल छायाचित्रे पाहताना मंत्री कैद

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

बंगळूर- टिपू जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी कर्नाटकचे मंत्री तन्वीर सैत हे मोबाईलमध्ये अश्लिल छायाचित्रे पाहताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

उत्तर कर्नाटकमधील रायचूर येथे गुरुवारी (ता. 10) टिपू जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सैत बसले होते. कार्यक्रम सुरू असताना ते मोबाईलमध्ये अश्लिल छायाचित्रे पाहत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल नेटवर्किंगसह स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रसारीत केला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्हीमधील छायाचित्रण उघड झाल्यानंतर विरोधकांनी सैत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर म्हणाले, 'सैप यांनी कार्यक्रमावेळी पाहिलेल्या अश्लिल छायाचित्रणाचा धिक्कार करतो. त्यांना थोडी तर लज्जा उरली असेल तर त्यांनी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.'

सैत म्हणाले, 'या घटनेबाबत क्षमा मागण्याचा प्रश्नच नाही. मोबाईलमध्ये व्हॉट्सऍपवरून आलेले मेसेजेस पाहात होतो. मी ते डाऊनलोड केलेले नाहीत. मला अश्लिल छायाचित्रे पाहण्याची सवय नाही.' मुख्यमंत्री सिद्धारमैया म्हणाले, या घटनेबाबत माहिती घेऊन सैत यांच्याशी चर्चा करणार आहे.