करणी सेनेची शिक्षणमंत्र्यांना कान आणि नाक कापण्याची धमकी

karni sena threatens chop off rajasthan minister kiran maheshwari nose ears
karni sena threatens chop off rajasthan minister kiran maheshwari nose ears

जयपूर- राजस्थानच्या शिक्षणमंत्री किरण माहेश्वरी यांना करणी सेनेनी कान आणि नाक कापून टाकण्याची धमकी दिली आहे. करणी सेनेचे म्हणणे आहे की, किरण माहेश्वरी यांनी राजपूतांची तुलना उंदरासोबत केली आहे आणि आम्ही ते सहन करणार नाही. किरण माहेश्वरी यांनी तत्काळ माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामास तयार रहावे अशी धमकी दिली आहे.

राजपूत समाज संघर्ष समिती येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात जाऊ शकते असे सोमवारी माध्यमाच्या प्रतिनिधीने सांगितल्यावर उत्तर देताना त्यांनी म्हटले होते की, काही छोटे-मोठे उंदीर असतात, जे निवडणुकांपुरते बाहेर येतात. यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी करणी सेनेचे प्ररदेशाध्यक्ष महिपाल मकराना यांनी एक व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राजपूत समाजामुळेच भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. गेली निवडणुक किरण माहेश्वरी यांनी याच उंदरांच्या जिवावर जिंकली आहे. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिकवायला हवा. काँग्रेस पक्षाकडून माहेश्वरी यांच्या या विधानाचा निषेध करण्यात आला आहे.

याआधीही पद्मावत या चित्रपटात राणी पद्मावतीचे पात्र निभावल्यामुळे अभिनेत्री दीपिका पदुकोनला करणी सेनेनी कान आणि नाक कापण्याची धमकी दिली होती. पद्मावत चित्रपटाला करणी सेनेनी विरोध केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com