आमदार थाटणार कलेक्टरशी संसार...

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

तिरुअनंतपुरमः 'ते' पुर्णवेळ राजकीय तर 'त्या' प्रशासकीय अधिकारी. दोघांचे एकमेकांशू सुत जुळतात आणि विवाहाचे नियोजन करतात. चित्रपटामधील ही कथा नसून, प्रत्यक्षात येथे घडत आहे.

काँग्रेसचे आमदार के. एस. सब्रिनंदन व तिरुअनंतपुरम येथील उप जिल्हाधिकारी दिव्या एस. आय्यर हे काही दिवसांतच विवाहबद्ध होणार आहेत. यामुळे राजकीय क्षेत्र व प्रशासकीय अधिकाऱयांमधील नातं अधिक घट्ट होणार आहे.

सब्रिनंदन यांनी याबाबत खुलासा करताना फेसबुकवरून म्हटले आहे की, 'मला अनेकजण विवाहाविषयी विचारणा करत होते. सध्या मी खूप आनंदी असून, सांगताना विशेष आनंद होत आहे. तिरुअनंतपुरम येथील उप जिल्हाधिकारी दिव्या यांच्याशी लवकरच विवाहबद्ध होणार आहे. आम्हा दोघांना तुमच्या आशिर्वादाची गरज आहे.' शिवाय, सब्रिनंदन यांनी फेसबुकवर दोघांचे छायाचित्रही अपलोड केले आहे.

पत्रकारांशी बोलताना दिव्या म्हणाल्या, एक प्रशासकीय अधिकारी राजकीय नेत्यासोबत विवाह करत आहे, यापेक्षा आम्हा दोघांना तुमच्या शुभेच्छांची आवश्यकता आहे. पुढील महिन्यात आम्ही विवाहबद्ध होत आहोत.