कुलगाममध्ये तिन दहशतवाद्यांचा खात्मा

कुलगाममध्ये तिन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर : जम्मू-कश्मिरच्या कुलगाम जिल्ह्यात रिवावारी (ता. 22) पहाटे सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकित तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यांच्याकडून ती वेगवेगळी शस्त्र हस्तगत करण्यात आली आहेत. याआधी शनिवारी (ता. 21) दहशतवाद्यांनी कुलगाममध्ये सलीम शाह या जवानाचे अपहरण करून त्याची हत्या केली होती. या चकमतिक मारले गेलेले दहशतवादी सलीम शहाच्या अपहरणात सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
जम्मू कश्मिरचे पोलिस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी ट्ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी लिहीले आहे की, कुलगाम  मधील जवान सलीम शाह यांचे अपहरण करून हत्या करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांना सुरक्षारक्षकांनी खुदवानीमध्ये घेरले आहे.

पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनूसार, दक्षिण कश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यातील खुदवानी भागात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. त्यानूसार त्या ठिकाणी नाकाबंदी आणि तलाशी अभियान सुरू केले होते. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर तलाशी अभियान चकमकित बदलून गेले. यामध्ये सुरक्षारक्षकांनी तीन दहशतवाद्यांना मारण्यात यश आले. ही चकमक आजूनही सुरू असून, संपुर्ण माहिती आजून मिळाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com