बंगाली मिठाईवाल्यांचा 'जीएसटी'ला विरोध

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 जून 2017

कोलकता: प्रस्तावित वस्तू आणि सेवाकर विधेयकास पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोध केला असताना आता बंगाली मिठाई विक्रेत्यांनीही या कराच्या विरोधात दंड थोपटले आहेत. नव्या करप्रणालीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मिठाई उद्योगावर पाच टक्के अतिरिक्त जीएसटी लागू केला जाणार असल्याने व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केला आहे.

रसगुल्ल्यासारखी पारंपरिक मिठाई "जीएसटी'च्या कक्षेतून वगळण्यात आली असली तरीसुद्धा मिठाई विक्रेत्यांची आक्रमक भूमिका कायम आहे. अन्य राज्यांत तयार होणारी मिठाई आणि बंगाली मिठाईमध्ये आमूलाग्र फरक असतो. बंगाली मिठाईच्या निर्मितीसाठी शुद्ध चीजचा आणि कमी साखरेचा वापर केला जातो.

"जीएसटी'अंतर्गत केंद्राने दूध, चीज, पनीर आदींवर शून्य टक्के कर लावला असला तरी रसगुल्ला आणि संदेशवर मात्र कर लावण्याचा सरकारचा विचार असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. याआधी "व्हॅट' करप्रणालीसही बंगाली मिठाई विक्रेत्यांनी विरोध केला होता.