नोटाबंदी, जीएसटी हा मोठा गैरव्यवहार : ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जुलै 2017

कोलकता: नोटाबंदी आणि जीएसटीचा निर्णय हा केंद्र सरकारचा सर्वांत मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप आज पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केला. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केलेली असताना जीएसटी, गोरखालॅंड आंदोलन, नोटाबंदी या मुद्यावरून तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आक्रमक राहणार असल्याचे सूतोवाच बॅनर्जी यांनी केले.

तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांची बैठक ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्‌द्‌यावरून आम्ही मूग गिळून बसणार नाही, मग आम्हाला तुरुंगवास झाला तरी बेहत्तर, असे बॅनर्जी म्हणाल्या. शेजारील देश भूतान, नेपाळ आणि बांगलादेश यांच्याशी संबंध खराब होण्यास मोदी सरकार जबाबदार आहे. त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. सीमेवरील चौक्‍या सीमाभागाचे रक्षण करण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप करत त्या म्हणाल्या की, सीमा कशामुळे खुल्या आहेत. एसएसबी, आयबी आणि रॉ येथे काय करत आहे. जमात उद दवाचे दहशतवादी भारतात कसे येत आहेत?, असा सवालही केला. राष्ट्रपती निवडणुकीत मतदान केल्यानंतर त्या म्हणाल्या, हे मत अन्यायाविरुद्ध आहे. देशहिताला सामोरे ठेवून भाजपला पाठिंबा देऊ नये आणि नागरिकांनी देशासाठी एक व्हावे.