बंगालमधील मिठाईवर यंदा पावसाचे सावट

वृत्तसंस्था
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

विजयादशमीनिमित्त खरेदीत घट

कोलकता: मिठाई आणि बंगाली लोकांचे नाते सर्वश्रुत आहे. दुर्गापूजेच्या उत्सवात तर मिष्ठान्नाची उलाढाल सर्वाधिक असते; पण यंदा नवरात्रोत्सवातील विजयादशमीचा सण याला अपवाद ठरला. या दिवशी मिठाई खरेदीचे प्रमाण कमी होते "जीएसटी'मुळे (वस्तू व सेवाकर) नव्हे तर पावसामुळे खरेदीवर परिणाम झाल्याचा दावा शहरातील हलवाई दुकानदारांनी बुधवारी केला.

"बाळाराम मुळीक अँड राधारमण मुळीक' या प्रसिद्ध मिठाई दुकानाचे पार्थ मुळीक म्हणाले,"" विजयादशमीला खरेदीत घट झाल्याचे कारण "जीएसटी' नसून पावसाचे सावट यंदा सर्व सणांवर पडले. अगदी राखी पौर्णिमेपासून दसऱ्यापर्यंतच्या सर्व सणांचा आनंद पावसाने हिरावून नेला.'' संततधार पावसामुळे ग्राहक दुकानात आलेच नाहीत, असे त्यांनी सांगितले. "गिरीशचंद्र डे अँड नाकुरचंद्र नंदी'चे सुदीप नंदी म्हणाले की, "जीएसटी'मुळे मिठाईच्या दरात वाढ झाली असली तरी, उत्तम प्रतीच्या मिठाईसाठी जादा पैसे मोजायला ग्राहक तयार आहेत. मात्र, शनिवारपासून (ता.30) सतत पडत असलेल्या पावसामुळे मिठाई घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचा ओघ कमी झाला. कोलकतामधील हे दुकान सर्वांत जुने असून बंगालची लोकप्रिय "संदेश' या मिठाईसाठी ते प्रसिद्ध आहे. यंदा विक्रीत किती घट झाली याबाबत अधिक माहिती देण्यास या दोन्ही दुकानदारांनी नकार दिला.

"विजयादशमीला होणाऱ्या मिठाई खरेदीत यंदा पावसामुळे घट हे खरे असले तरीही सणासुदीच्या काळानंतर आम्ही "जीएसटी'विरुद्ध आंदोलन करणार आहोत,' असे "पश्‍चिम बंगाल मिष्ठान्न व्यावसायिक समिती'च्या प्रवक्‍त्याने सांगितले.

मिठाईवर "जीएसटी'चा भार
पश्‍चिम बंगालमध्ये रसगुल्ला, संदेश, जलभरास, पंतुआ, रबडी अशा मिठाईंवर यंदा 1 जुलैपासून पाच टक्के "जीएसटी' लागू झाला आहे. तसेच केशर टाकून केलेली व चांदीचा वर्ख लावलेल्या मिठाईवर 18 टक्के कर लावण्यात आला आहे.