कोलकतामध्ये दीड कोटींच्या जुन्या व नव्या नोटा जप्त

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

मध्य कोलकतामध्ये छापा टाकून 1.48 कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. यामध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांसह दोन हजार रुपयांच्या नव्या नोटाही आहेत.

कलोकता - कोलकता पोलिसांनी शुक्रवारी रात्री 1.48 कोटी रुपयांच्या जुन्या व नव्या नोटा जप्त केल्या आहोत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातही आठ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

वरिष्ठ पोलिसांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य कोलकतामध्ये छापा टाकून 1.48 कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. यामध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांसह दोन हजार रुपयांच्या नव्या नोटाही आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, प्रदीप रॉय, अरुण सिंह आणि संजीव घोष या तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी सुरु असून, व्यवसायाशी संबंधित हा पैसा असल्याचे समोर येत आहे. हवालाशी याचा काही संबंध आहे का, हे पाहण्यात येत आहे.

मिदनापूर जिल्ह्यात पोलिसांनी आठ लाख रुपये जप्त केले आहेत. स्वयंसेवी संस्था चालवत असलेल्या व्यक्तीकडून हे पैसे जप्त करण्यात आले आहेत. पूर्णा गांगुली या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यामध्ये बँक अधिकारी सहभागी असल्याची शक्यता असून, चौकशी करण्यात येत आहे.