हिमस्खलनामध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविले

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

श्रीनगर: लडाख येथे हिमस्खलनामध्ये अडकलेल्या 71 पर्यंटकांना लष्कराने बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यात 21 महिला आणि मुलांचा समावेश आहे. लष्कराच्या प्रवक्‍त्याने आज या घटनेची माहिती दिली. लडाखमध्ये हिमस्खलन गेल्या काही दिवसांपूर्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

चांग ला पास आणि तंगस्ता गावादरम्यान झालेल्या हिमस्खलनामध्ये पयॅयक अडकले होते. पूर्व लडाखमध्ये तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांनी फसलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. लष्कराने केवळ बाहेर काढले नाही तर त्यांचे भोजन, कपडे आणि वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून दिल्या. मात्र, लष्कराच्या प्रवक्‍त्याने ही घटना कधी घडली, याची माहिती देण्यास नकार दिला.

Web Title: ladakh: Tourists move to safe place